“मी ऐश केली’

महाबळेश्‍वर – घरकुल योजनेसह अन्य सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई व तापोळा येथील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या मंगल मोरे या महिलेने चौकशीत दिलेल्या उत्तरामुळे पोलिसांवर चकित होण्याची वेळ आली. लोकांना फसवून मिळवलेल्या लाखो रुपयांचे काय केले, असा सवाल पोलिसांनी तिला विचारला असता, मी ऐश केली, असे उत्तर तिने दिले.

दरम्यान, मंगल मोरे हिच्याविरोधात तक्रार करण्यासाठी आज अनेक जणांनी महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अटक केल्यानंतर मंगल मोरेची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समाजसेविका अशी प्रतिमा तयार करून मंगल मोरे या ठकबाज महिलेने महाबळेश्‍वर महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई व तापोळा येथील गरीब व मध्यमवर्गीय लोकांना आपले सावज केले होते. आपल्या कामाची जाहिरात होण्यासाठी तिने तथाकथित बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी सहली आयोजित केल्या होत्या.

सहलीला गेलेल्या महिला मंगल मोरेसाठी “गिऱ्हाईकांना’ आकर्षित करण्यात मदत करत होत्या, अशी माहिती उघडकीस आली आली आहे. एकदा सावज टिपल्यावर त्याची खात्री पटण्यासाठी मंगल हिने रोख रक्‍कम घेतानाच संबंधिताचे आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड व फोटो घेत होती. त्यामुळे तिने भाड्याने घेतलेल्या घरात कागदपत्रांच्या फायलींचे गठ्ठे सापडले आहेत. आपल्याला एक मुलगा असून तो पुण्यात जीम ट्रेनर आहे. त्याला दोन वर्षात कधीच भेटले नाही, अशी माहिती मंगल मोरेने पोलिसांना दिली आहे. लोकांकडून पैसे घेतल्यानंतर तिने कोणालाही त्याची पावती दिलेली नाही. त्यामुळे तिच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी बरेच जण पुढे येत नसल्याचे बोलले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)