मुंबई : इंडिगो आणि एअर इंडियानंतर स्पाइसजेट आणि गोएअर यांनीही बुधवारी स्टॅन्ड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. कमारा यांनी मंगळवारी इंडिगोच्या मुंबई-लखनऊ विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना त्रास दिला होता. तर आता या वादात राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर आपले रोकठोक मत सोशल मीडियावर व्यक्त करणारे बॉलिवूडचा प्रसिद्ध फिल्म मेकर अनुराग कश्यप याने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
No @IndiGo6E .. on @airvistara .. in solidarity with @kunalkamra88 pic.twitter.com/HagCufQf34
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) February 3, 2020
अनुराग कश्यप याने ट्विट करत सांगितले,’“जोपर्यंत इंडिगो विमान कंपनी कुणाल कामरावरील बंदी हटवत नाही तोपर्यंत आपणही इंडिगोच्या विमानाने प्रवास करणार नाही. मला हे जाणून घ्यायचं आहे की, कुणाल कामरानं काय चूक केली. उलट मी असा विचार केला की, मी इंडिगोच्या विमान प्रवासावर बहिष्कार घालू शकतो. त्यामुळे कोलकात्याला एका कार्यक्रमाला जाताना मी विस्ताराच्या विमानानं प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मला आयोजकांनी सांगितले की, विस्ताराच्या विमानाने जाण्यासाठी तुम्हाला सकाळी ४ वाजता उठावं लागेल. त्यावर मी पहाटे चार वाजता उठेन पण इंडिगोच्या विमानानं प्रवास करणार नाही, असं त्यांना सांगितल आहे.