पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कूच बेहार येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “जर जनतेला चित्रपट पाहायचे असतील तर ते गांधीजी, आंबेडकरजी यांच्यावर आधारित चित्रपट पाहतील. मोदींचा चित्रपट कोणीही पाहणार नाही कारण त्यांचं भारताच्या विकासामध्ये कोणतंही योगदान नाहीये.”
दरम्यान, आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगल्याचं पाहायला मिळत आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलगुरी येथील एका जाहीर सभेमध्ये बोलताना ममतांना ‘स्पीडब्रेकर दीदी’ संबोधले होते तर ममतांनी मोदींना प्रतिउत्तर देताना त्यांना ‘एक्सपायरी बाबू’ संबोधलं होत. अशातच आता आज ममतांनी मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला असून आता पंतप्रधान मोदी या टीकेचे कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
West Bengal CM Mamata Banerjee in Cooch Behar on PM Modi: Why will people watch your film? If people want to watch films they will watch films on Gandhiji, Ambedkar ji, why Modi? What contribution he has made to India? pic.twitter.com/OHQIlbKdBX
— ANI (@ANI) April 4, 2019