पुलवामा हल्ल्याच्या तपासाचे पुढे काय आले?

कॉंग्रेस नेते राहुल गांधींचा सरकारला सवाल

नवी दिल्ली : पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 ला जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्लेखोराने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. आज देशभरात नागरिकांकडून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यामुळे सर्वाधिक फायदा कोणाला झाला? या हल्ल्याच्या तपासात काय समोर आले? आणि सरकारमधील कोणत्या व्यक्तीला यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे, अशी प्रश्नांची सरबत्तीच राहुल गांधी यांनी केली आहे.


राहुल यांनी शहीद जवानांच्या पार्थिवाचे छायाचित्र शेअर करत व्‌टि केले आहे. आज जेव्हा आम्ही पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांचे स्मरण करत आहोत. त्यावेळी आपल्याला विचारावे लागेल की, या हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? या हल्ल्याच्या तपासात काय निघाले? या हल्ल्याशी निगडीत सुरक्षेतील त्रुटीसाठी भाजप सरकारमध्ये कोणाला उत्तरदायित्व ठरवण्यात आले आहे?

दरम्यान, या हल्ल्याने अवघा देश हादरला, मात्र वर्ष उलटूनही काही शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अक्षरश: हेलपाटे घालावे लागत आहेत. शहिदांच्या कुटुंबीयांना अनेक आश्वासने देण्यात आली होती, मात्र त्यांची पूर्तता अद्यापही झाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.