ऑस्ट्रेलियामध्ये व्हेल वाचवण्याची मोहीम

होबार्ट (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेटाजवळ भरकटलेल्या तब्बल 270 व्हेलना पुन्हा समुद्रात सोडण्याची एक मोहीम तेथील सागरप्रेमींनी सुरू केली आहे. 

वाळूच्या बेटाजवळ अडकून पडलेल्या या व्हेलपैकी एकतृतीयांश व्हेलचा यादरम्यान मृत्यू झाला असून 25 व्हेलना पुन्हा समुद्रात सोडून देण्यात यश आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सोमवारी या खाडीमध्ये व्हेल आढळून आल्या होत्या. किनारपट्टीजवळच्या स्ट्राहान शहराजवळचा पश्‍चिमेकडील समुद्रकिनारा आणि वाळूच्या किनाऱ्यादरम्यान या व्हेल अडकून पडल्या होत्या. त्यांना तेथून बाहेर काढून पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी सुमारे 60 पर्यावरणप्रेमींनी प्रयत्न सुरू केले होते.

आजपर्यंत 25 व्हेलना पुन्हा समुद्रात सोडण्यात यश आले आहे. या सर्व व्हेलना कालव्यातून समुद्रापर्यंत नेण्यात आले. त्यानंतर त्यांना समुद्रात सोडून देण्यात आले. या व्हेलना समुद्राच्या दिशेने नेण्याचे काम अजूनही सुरूच आहे.

त्यामुळे व्हेल वाचवण्याच्या या मोहिमेत आणखी काही व्हेल वाचवण्यात यश येईल, असे बचाव पथकातील काहींनी सांगितले. टास्मानिया पार्क्‍स आणि वाईल्डलाईफ सर्व्हिस मॅनेजर निक डेका यांनी माहिती दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.