जुन्नर तालक्यात उच्चांकी बाजारभाव असल्याने काढणीची लगबग
महिला शेतमजुरांना दोनशे पन्नास ते दोनशे रुपये मजुरी
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झाली होती कांद्याची लागवड
बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातीच्या पूर्व पट्ट्यात खरीप कांदा काढणी वेग आला आहे. यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने. जुन्नर तालुक्यातील बेल्हे, रानमळा, साकोरी, मंगरूळ, पारगाव, बांगरवाडी तसेच जुन्नर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या पारनेर तालुक्यातील अळकुटी, कळस, पाडळी आळे, गारखिंडी, दरोडी, रांधे, पाबळ, शिरापूर, रेनवडी, म्हस्केवाडी, चोंभूत या भागात मोठ्या प्रमाणात खरीप कांदा लागवड झाली होती. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रामुख्याने खरीप कांदा लागवडी मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या.
यावर्षी उच्चांक बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक काढणीच्या लगबगीत आहे. तर पावसाने उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे. यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे परिसरातील नाले, तलाव, बंधारे, विहिरी, तुडुंब भरलेले आहेत. त्याचा फायदा घेत शेतकरऱ्यांनी खरीप कांद्याची मोठ्या प्रमाणात लावगड केली होती. दुसऱ्या टप्प्यातील कांदा लागवडीही मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत.
पाण्याची उपलब्धता पाहता पाटपाण्याची लागवडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. बाजरभाव मिळेल या आशेने हा खरीप हंगामातील कांदा लागवड झाली होती. कांदा लागवडीसाठी एका महिला शेतमजुराला दोनशे पन्नास ते दोनशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे. उच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कांदा पिकल्यानंतर ते तातडीने आळेफाटा व पारनेर बाजार समितीत घेऊन जात आहे.