#CWC19 : नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

मॅंचेस्टर – विश्‍वचषक स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी वेस्ट इंडिजला आजच्या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. आतापर्यंत एकही सामना न गमविणाऱ्या न्यूझीलंडला ही लढत जिंकून उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी आहे.

वेस्टइंडिज आणि न्यूझीलंड याच्यांतील सामन्यास थोडयाच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा वेस्टइंडिज संघाने जिंकला आहे. वेस्टइंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

 

दरम्यान, वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवित या स्पर्धेत शानदार सलामी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा त्यांचा सामना पावसाने धुतला होता. वेस्ट इंडिजने आजचा सामना जिंकला नाही तर त्यांच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात येणार आहेत. न्यूझीलंडचा भारताविरूद्धचा सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. त्यांनी अन्य सामने जिंकून अपराजित्त्व राखले आहे.

न्यूझीलंड संघ –

मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, रॉस टेलर, टॉम लाथम, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट

वेस्ट इंडिज संघ –

क्रिस गेल, एविन लुईस, शाइ होप, निकोलस पुरन, शिमरोन हेट्मेयर, जेसन होल्डर, कार्लोस ब्रेथवेट, ऐश्ले नर्स, केमार रोच, शेल्डन कॉटरेल, ओशन थॉमस

Leave A Reply

Your email address will not be published.