#ENGvWI 1st Test : वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर विजय

साउदम्पटन – करोनाच्या सावटात खेळवल्या गेलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत वेस्ट इंडिजने यजमान इंग्लंडचा 4 गडी राखून सहज पराभव केला व तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. संघाला एकहाती विजय मिळवून देताना जेरेमी ब्लॅकवूडने दमदार खेळी केली. मात्र, त्याचे शतक केवळ 5 धावांनी हुकले. 

मार्च महिन्यापासून करोनाचा धोका वाढल्याने जगभरातील क्रिकेट ठप्प झाले होते. अशा स्थितीत प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी न देता रिकाम्या मैदानावर हा सामना खेळवला गेला. पहिल्या दिवसापासूनच वेस्ट इंडिजने सामन्यावर वर्चस्व राखले. इंग्लंडचा पहिला डाव द्विशतकी धावांवर संपुष्टात आणल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्या डावात त्रिशतकी धावा करत शतकी आघाडी घेतली. त्यानंतर सावध फलंदाजी करत असलेल्या इंग्लंडचा दुसरा डावही त्यांनी त्रिशतकी धावांवर संपवला व विजयासाठी आवश्‍यक असलेल्या 200 धावा सहज पार करत एक शानदार विजय मिळवला.

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने सुरुवातीला बळी घेत पाहुण्यांवर वर्चस्व राखले मात्र, त्यानंतर रॉस्टन चेस व ब्लॅकवूड ही जोडी जमली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 73 दावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाचा विजय दृष्टीपथात आणला. या जोडीने 68 धावांची बहुमोल भागीदारी केली. डॉवरीचला बेन स्टोक्‍सने बाद केले. कर्णधार जेसन होल्डरने ब्लॅकवूडला सुरेख साथ दिली. दरम्यान ब्लॅकवूडने आपले अर्धशतक पूर्ण करुन शतकाकडे कूच केली होती. मात्र, त्याचे शतक अवघ्या 5 धावांनी हुकले.

वेस्ट इंडिजचा दुसरा डाव सुरू झाल्यावर आर्चरने घेतलेल्या 3 बळींमुळे एकवेळ सामन्यात रंगत आली होती. त्यावेळी इंग्लंडलाही विजयाची संधी होती. मात्र, ब्लॅकवूडने संयमी फलंदाजी करत इंग्लंडच्या हातातून विजय खेचून आणला. आर्चरच्या यॉर्करवर जायबंदी झालेला जॉन कॅम्बेल पुन्हा फलंदाजीसाठी आला व त्याने होल्डरला साथ देत संघाचा विजय साकार केला.

संक्षिप्त धावफलक :

इंग्लंड पहिला डाव – 204. वेस्ट इंडिज पहिला डाव – 318. इंग्लंड दुसरा डाव – 313. वेस्ट इंडिज दुसरा डाव – 64.2 षटकात 6 बाद 200. (जेसन होल्डर नाबाद 14, जॉन कॅम्बेल नाबाद 8, जेरेमी ब्लॅकवूड 65, शेन डॉवरी 20, रॉस्टन चेस 37, जोफ्रा आर्चर 3-45, बेन स्टोक्‍स 2-39).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.