#CWC19 : विल्यमसनचे लागोपाठ दुसरे शतक; वेस्ट इंडिजपुढे 292 धावांचे लक्ष्य

मॅंचेस्टर – कर्णधार केन विल्यमसन याने लागोपाठ दुसरे शतक ठोकले, त्यामुळेच न्यूझीलंडला वेस्ट इंडिजपुढे 292 धावांचे आव्हान ठेवता आले. विडींजकडूव शेल्ड्रॉन कॉट्रिल याने चार गडी बाद करीत प्रभावी कामगिरी केली.

कॉट्रिल याने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तील व कॉलीन मुन्रो या दोन्ही सलामीविरांना शून्यावर बाद केले. मात्र, त्यानंतर विल्यमसन व रॉस टेलर यांनी शैलीदार खेळ करीत संघाचा डाव सावरला. एवढेच नव्हे त्यांनी 169 धावांची भागीदारी करीत संघास आश्‍वासक धावसंख्या रचण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. टेलर याने 95 चेडूंमध्ये 7 चौकारांसह 69 धावा केल्या. विल्यमसन याने 14 चौकार व एक षटकारासह 148 धावा केल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात शतक केले होते व संघास रोमहर्षक विजय मिळवून दिला होता.

शेवटच्या षटकांमध्ये जेम्स नीशाम याने एक षटकार व एक चौकारासह 28 धावा केल्या. निर्धारित षट्‌कात न्यूझीलंडने 8 बाद 291 धावांपर्यंत मजल गाठली. वेस्ट इंडिजकडून शेल्ड्रॉन कॉट्रील याने 56 धावांमध्ये चार गडी बाद केले. कार्लोस ब्रेथवेट याने 58 धावांमध्ये दोन विकेट्‌स घेतल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here