#CWC19 : वेस्ट इंडिजला विजय अनिवार्य ; न्यूझीलंडचे पारडे जड

स्थळ- ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर,
वेळ – सायं. 6 वाजता

मॅंचेस्टर – विश्‍वचषक स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी वेस्ट इंडिजला आजच्या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. आतापर्यंत एकही सामना न गमविणाऱ्या न्यूझीलंडला ही लढत जिंकून उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी आहे.

वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवित या स्पर्धेत शानदार सलामी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा त्यांचा सामना पावसाने धुतला होता. वेस्ट इंडिजने आजचा सामना जिंकला नाही तर त्यांच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात येणार आहेत. न्यूझीलंडचा भारताविरूद्धचा सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. त्यांनी अन्य सामने जिंकून अपराजित्त्व राखले आहे.

न्यूझीलंडच्या खेळाडूंनी या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांचा कर्णधार केन विल्यमसन याने आफ्रिकेविरूद्धच्या लढतीत नाबाद शतक टोलवित संघास शानदार विजय मिळवून दिला होता. आजही त्याच्याकडून त्याच कामगिरीची अपेक्षा आहे. रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम यांच्यावरही त्यांची मदार आहे. गोलंदाजीत त्यांना ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन,मिचेल सॅंटनर, इश सोधी यांच्याकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे.

डॅरेन ब्राव्हो, शिमोरन हेटमेयर, शाय होप, एल्विन लुईस यांच्यावर वेस्ट इंडिजच्या फलंदाजीची भिस्त आहे. ख्रिस गेल याचे अपयश ही त्यांच्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. गोलंदाजीत शेल्डॉन कॉट्रेल, ओशाने थॉमस व जेसन होल्डर यांच्यावर त्यांची मदार आहे.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तील, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी.

वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमोरन हेटमेयर, शाय होप, एल्विन लुईस, अशले नर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), केमार रोच, आंद्रे रसेल, ओशाने थॉमस.

Leave A Reply

Your email address will not be published.