#CWC19 : विंडिजच्या तोफखान्यापुढे आज बांगलादेशची परीक्षा

स्थळ : टॉटन
वेळ : दु. 3 वा.

टॉटन – विश्‍वचषकाच्या सुरुवातीपासूनच कोणत्याही संघाला पराभवाचा धक्‍का देण्याची ताकड ठेवणारे संघ म्हणून परिचित असणारे बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचे संघ आज समोरासमोर असणार आहेत. मात्र, आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघातील वेगवान गोलंदाजांसमोर त्यांच्या फलंदाजांची परीक्षा होणार हे नक्‍की.

यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या संघाने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला पराभवाचा धक्‍का देत सकारात्मक केली होती. तर, वेस्ट इंडिजच्या संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव करत धडाक्‍यात सुरूवात केली. मात्र, यानंतर दोन्ही संघांना पुन्हा विजय मिळवण्यात अपयश आले आहे. ज्यात बांगलादेशने आपला दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध गमावला. तर, तिसऱ्या सामन्यात त्यांना इंग्लंडकडून 106 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, श्रीलंके विरुद्धचा सामना पावसाने रद्द झाल्याने दोन्ही संघांना एक-एक गुण बहाल करण्यात आला होता.

तर, दुसरीकडे वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी पराभव करत धमाकेदार सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर, दक्षिण आफ्रिके विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना त्या सामन्याचा एक गुण मिळाला होता. मात्र, चौथ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध त्यांचा आठ गड्यांनी पराभव झाला होता.

प्रतिस्पर्धी संघ –

बांगलादेश – मशरफे मोर्तझा (कर्णधार), लिट्टन दास (यष्टीरक्षक), तमीम इक्‍बाल, सौम्य सरकार, मुशफकीर रहीम, शकीब अल हसन, अबू जायेद, महमदुल्लाह, मेहंदी हसन मिर्झा, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादेक हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, रुबेल हुसैन, सब्बीर रहमान.

वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमोरन हेटमेयर, शाय होप, एल्विन लुईस, अशले नर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), केमार रोच, आंद्रे रसेल, ओशाने थॉमस

Leave A Reply

Your email address will not be published.