#CWC19 : वेस्टइंडिजचे बांगलादेशसमोर 322 धावांचे आव्हान

टॉटन – सलामीवीर फलंदाज ख्रिस गेल शून्यावर बाद झाल्यानंतर एविन लुईस, शाइ होप आणि शिमरोन हेटमेयर यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्टइंडिजने बांगलादेशसमोर विजयासाठी 322 धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझा याने क्षेत्ररक्षण स्विकारून वेस्टइंडिजला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं.

प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिजने 50 षटकांत 8 बाद 321 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर क्रिस गेलला मोहम्मद सैफुद्दीन याने शून्यावर बाद करत वेस्टइंडिजला पहिला झटका दिला. त्यानंतर एविन लुईस आणि शाइ होप यांनी दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागिदारी केली. एविन लुईसने 67 चेंडूत 70 तर शाइ होप याने 121 चेंडूत 96 धावा केल्या.

त्यानंतर शिमरोन हेटमेयर याने 26 चेंडूत शानदार 50 धावा करत संघाची धावसंख्या दोनशेच्या पार नेली. जेसन होल्डरने 15 चेंडुत 33 धावा करत संघाची धावसंख्या तीनशेच्या जवळ पोहचवली. आंद्रे रसेल ही शून्यवर बाद झाला.

बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले तर शाकिब अल हसन याने 2 गडी बाद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)