इस्लामाबाद : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि देशाला दोन विश्वचषक जिंकून देणारा अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला असून त्यानुसार त्याला नागरिकत्व देण्यात आले आहे.
I am truly honored to be given this civilian award.We took a small step in the right direction in 2017and look at us here today.All the foreign players played their part.Thank u Pakistan for the love shown to us.We only want U to experience cricket at home.#LOVEWINS https://t.co/BEVEJXmkH2
— Daren Sammy (@darensammy88) February 23, 2020
पाकिस्तानात सुरू असलेल्या पेशावर जाल्मी या संघाचा तो कर्णधार आहे. पाकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट सुरू करण्यात सॅमीचे मोठे योगदान आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) पाचव्या हंगामाला नुकतीच सुरूवात झाली आहे. या स्पर्धेच्या दुस-या हंगामात सॅमी खेळला होता. तोपर्यत या स्पर्धेत कोणताही विदेशी खेळाडू खेळण्यास तयार नसे. पीएसएलच्या दुस-या हंगामात त्याने पेशावर संघाचे नेतृत्व केले आणि विजेतेपद मिळवून दिले.
पेशावर संघाचे मालक मालिक जावेद यांनी सांगितले, सॅमी हा संघाचा अविभाज्य भाग आहे. खुद्द सॅमीने याप्रकरणी त्यांची मदत मागितली होती. दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सॅमीला पाकिस्तानचे नागरिकत्व दिले गेल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले.