नॉटिंगहॅम : ओशेन थॉंमसच्या आणि जेसन होल्डर यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडिजने पाकिस्तानच्या संघाला अवघ्या 105 धावांवर गारद केले आहे.
WOW!
What a performance by the #MenInMaroon – they've bowled out Pakistan for just 105. #WIvPAK LIVE 👇https://t.co/YTelzKYwRl pic.twitter.com/vjdSCzePTl
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) May 31, 2019
नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजच्या कर्णधाराने पाकिस्तान संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. त्यानंतर विंडिजच्या गोलंदाजीचा सामना करताना पाकिस्तानचा संघ 21.4 षटकांत सर्वबाद 105 धावाचं करू शकला. पाकिस्तानकडून फखर जमान आणि बाबर आजम यांनी प्रत्येकी सर्वाधिक 22 धावा केल्या. तर मोहम्मद हफीजने 16 आणि वहाब रियाजने 18 धावा केल्या.
वेस्टइंडिज संघाकडून गोलंदाजीत ओशेन थाॅमसने सर्वाधिक 4 तर जेसन होल्डरने 3 गडी बाद केले. आंद्रे रसेलने 2 तर शेल्डन काॅटरेलने प्रत्येकी 1 गडी बाद केला.