#WIvNZ : गॅब्रीयलचे ब्राव्होला उद्देशून अपशब्द

वेलिंग्टन – यजमान न्यूझीलंड व वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात हेन्री निकोल्सचे तीन झेल सोडल्यामुळे संतापलेल्या शॅनन गब्रियलने डॅरेन ब्राव्होला भर मैदानावरच अपशब्दांची लाखोली वाहिली.

या सामन्यात निकोल्सच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने मोठी धावसंख्या उभारली व वेस्ट इंडिजसमोर पराभव टाळण्याचे आव्हान उभे केले. वेस्ट इंडिज संघाने न्यूझीलंडच्या डावात अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण केले होते. शतकवीर निकोल्सचे तीन झेल सोडले गेले.

गचाळ क्षेत्ररक्षकामुळे वेगवान गोलंदाज गॅब्रियलचा तोल ढळला व त्याने ब्राव्होला उद्देशून भर मैदानावरच अपशब्द वापरले. ब्राव्होकडून झेल सुटल्यानंतर लगेच त्याच धावासंखेवर असताना निकोल्सला आणखी एक जिवनदान मिळाले. चेमार होल्डरकडूनही निकोल्सचा झेल सुटला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.