कोलकाता – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने काही राज्यांनी पुन्हा एकदा लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेतलाय. अशातच आज पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील आठवड्यातील दोन दिवस कडक लॉक डाऊन पाळण्याच्या निर्णयाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Lockdown (2 days in the week) in the state extended till 31st August: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/MRKpPjcHZ6
— ANI (@ANI) July 28, 2020
याबाबतची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. आठवड्यातील दोन दिवसांचा लॉक डाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात येत असला तरी १ ऑगस्टरोजी बकरी ईद निमित्ताने राज्यात लॉक डाऊन नसणार आहे, असं देखील बॅनर्जी यांनी सांगितलं.
No lockdown in the state on August 1st on the occasion of Bakr Eid: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/TqS8N9AFVl
— ANI (@ANI) July 28, 2020