कोलकाता – भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्या नेतृत्वाखाली बेंगळुरू एफसी संघाने ड्युरंड करंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण प्रसंगी पश्चिम बंगालचे राज्यपाल गणेशन यांनी फोटोमध्ये व्यवस्थित दिसून येण्यासाठी छेत्रीलाच मागे ढकलले. (West Bengal Governor Pushing Aside Sunil Chhetri For A Photo Has Everyone Fuming) यावरून आता नवा वाद सुरू झाला असून छेत्रीचा अपमान का केला गेला, असा सवालही आता फुटबॉल प्रेमी विचारत आहेत.
या स्पर्धेच्या अंतिम लढतीत सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू एफसी संघाने मुंबई सिटी एफसीचा संघाचा 3-1 असा पराभव केला. कोलकातातील सॉल्ट लेट स्टेडिअमवर हा अंतिम सामना पार पडला.
He owes an apology to Sunil Chhetri and Indian football 😡#IndianFootball #IFTWCpic.twitter.com/AnbxybeoG3
— IFTWC (@IFTWC) September 19, 2022
सामना संपल्यानंतर पुरस्कार वितरण प्रसंगी पश्चिम बंगालचे राज्यपाल गणेशन यांनी आपण फोटोमध्ये व्यवस्थित यावे यासाठी छेत्रीला मागे ढकलले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून क्रीडाप्रेमींनी प्रचंड संतापही व्यक्त केला आहे. छेत्रीसह शिवशक्ती नारायण या खेळाडूलाही असेच मागे ढकलल्याचेही त्यात दिसत आहे.