कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर बुधवारी नंदिग्राममध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यात ममता यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र, ममता यांच्या पायाला झालेली दुखापत काहीशी बारी झाल्यानंतर आज (दि. १४) त्या रॉड शो करणार आहेत. गांधी पुतळ्यापासून ते हजरापर्यंत ममता बॅनर्जी आज रोड शो करतील.
नंदिग्राममधील हल्ल्या नंतर ममता बॅनर्जी यांना शुक्रवारी संध्याकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ममता बॅनर्जींची ही पहिली सभा असणार आहे. ममता बॅनर्जींच्या डाव्या पायाला आणि खांद्याला मानेवर गंभीर दुखापत झाली होती.
.@BJP4Bengal Brace yourselves to see the power of people of BENGAL on Sunday, May 2nd.
Get READY!!! pic.twitter.com/dg6bw1TxiU
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) March 10, 2021
“निवडणूक प्रचारादरम्यान बुधवारी मी माझ्या गाडीबाहेर उभी होते व गाडीचे दार उघडे होते. मी मोटारीत बसत असताना ४-५ जणांनी मला धक्काबुक्की करून ढकलल्यामुळे आपल्या पायाला जखम झाली, असा आरोप देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कडून करण्यात आला होता.