कोलकाता – कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी भारताने कंबर कसली असून या विषाणूचा संसर्ग ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. अशातच आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या राजधानीतील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी थेट कोलकाता मेडिकल कॉलेज गाठत अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज कोणताही पूर्वनियोजित दौरा नसताना कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी थेट कोलकात्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या या आकस्मित दौऱ्यामुळे पोलीस प्रशासन व इतर शासकीय अधिकाऱ्यांची धांदल उडाली. यावेळी ममता यांनी मेडिकल कॉलेजमधली वैयद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा देखील घेतला.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee pays surprise visit to Kolkata Medical College. pic.twitter.com/aJCap279OZ
— ANI (@ANI) March 24, 2020