कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे प. बंगालचे प्रदेशाध्यक्ष जय प्रकाश मुजुमदार यांना तृणमूल कॉंग्रेसच्या कथीत कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यांना काही कार्यकर्ते लाथा घालत असल्याची चित्रफित व्हायरल होत आहे.
फिर चुनावी हिंसा !!!
पश्चिम बंगाल में हो रहे तीन विधानसभा उपचुनाव में #TMC के गुंडे जमकर हिंसा और मारपीट कर रहे हैं। करीमपुर के #BJP उम्मीदवार श्री जयप्रकाश मजूमदार के साथ तो खुलकर मारपीट की गई! दरअसल, ये हार का वो भय है, जो #TMC कार्यकर्ता महसूस कर रहे हैं!#mamatakegunde pic.twitter.com/XZn1kV5CmP
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) November 25, 2019
हा प्रकार करमिपूर मतदार संघातील फिपुलखोला येथे घडला. विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तेथे मतदान होत आहे. मतदान केंद्राला भेट देण्यासाठी ते तेथे गेल्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेला तृणमूल कॉंग्रेसचे गूंडच जबाबदार आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. पक्षाच्या निवेदनात अंगावरील जखमा बऱ्या होतील पण लोकशाहीची हत्या झाली त्याचे काय? असा सवाल करण्यात आला आहे.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी एएनआयचे हे फुटेज ट्विटर अकाउंटवर अपलोड केले आहे. तृणमूकल कॉंग्रेसचे कार्यकर्ते हिंसाचार घडवत आहेत. ते हाणामारीवर उतरले आहेत, असे म्हटले आहे. भाजपाचे मुजुमदार म्हणाले, ते मला मारहाण करू शकतात. मात्र माझे नीतीधैर्य खचवू शकणार नाहीत. मी निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे आरोप तृणमूल कॉंग्रेसने फेटाळले असून स्थानिकांनी निवडणुकांचे वातावरण दुषित करण्याच्या प्रयत्न केल्याच्या रागातून त्यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. करीमपूरशिवाय खरगपूर आणि कालियागंज मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहेत. दुपारी 11 वाजेपर्यंत तेथे 17 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.