आम्ही लग्नाळू! ‘हे’ नियम पाळाच अन्यथा भरावा लागेल १० हजारांचा दंड

मुंबई – राज्यावरील करोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. आज रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अनेक गोष्टींवर बंधने आणली जाणार आहेत. विवाह सोहळ्यातील उपस्थितीवरही मर्यादा आणल्या असून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.

अशी आहे विवाह सोहळ्याची नवी नियमावली

* विवाह समारंभ कमाल केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्यास परवानगी असेल .

* मंगल कार्यालय किंवा विवाह समारंभ स्थळी अभ्यागतांना सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करणे आवश्यक असेल अथवा त्यांनी वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी एन ए ए टी  चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक असेल.

* उपरोक्त पैकी कोणीही लसीकरण केले नसेल अथवा   वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी एन ए ए टी  चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगले नसल्यास सदर तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस रु १००० दंड व आस्थापनेकडून  रु १००००  वसूल करण्यात येईल.

* एखाद्या ठिकाणी गुन्ह्याची पुनरुक्ती होत असल्यास महासाथ ओसरेपर्यंत सदर जागा टाळेबंद करण्यात येईल व तेथे कोणत्याही पद्धतीचे संमेलन / एकत्रीकरण आयोजित करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.

* एखादा विवाह समारंभ धार्मिक प्रार्थनास्थळी आयोजित केल्यास उपरोक्त नियमांच्या अधीन राहून त्यासाठी परवानगी देण्यात येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.