पुणे – दहा वर्षाच्या मुलाचा कॅनोलच्या पाण्यात बुडून दुर्देैवी मृत्यू झाला. खेळताना पाण्यात गेलेला चेंडू काढण्यासाठी गेला असता ही घटना घडली. रोहन सुरवसे (वय. १०,रा. गल्ली न.१७,गारमळ, धायरी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना (गल्ली नंबर 17, गारमाळ धायरी) लगत वाहणाऱ्या कॅनोलमध्ये सोमवारी दुपारी दिड वाजताच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन साईराज जेधे आणि आयन नासिर शेख ही तीन मुले कॅनॉलच्या कडेला क्रिकेट खेळत होती. खेळताना त्यांचा चेंडु कॅनॉलच्या पाण्यात गेला. हा चेंडु काढण्यासाठी दोघे कॅनॉलच्या पाण्यात उतरली. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हे दोघे जण पाण्यात वाहुन जाऊ लागले.
दरम्यान यावेळी वरती असलेल्या मुलाने आरडाओरडा केल्याने येथुन जात असलेल्या प्रज्वल दीपक जंवजाळ या मुलाने पाहिले. त्याने क्षणाचाही विचार न करता व आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडणाऱ्या एका मुलाला कसे बसे बाहेर काढले. परंतु तो पर्यंत दुसरा मुलगा पाण्यात कॅनॉलच्या मध्यभागी जाऊन पाण्यात बुडाला.