पुणे जिल्हा: खरिपात गेले, रब्बीत मिळेल का?

पुरंदर तालुक्‍यातील बळीराजा प्रश्‍न मनातच दडवत रब्बीच्या तयारीत व्यस्त

ए. टी. माने

केतकावळे – निसर्गाच्या लहरपणामुळे हातातोंडाशी आलेला घास खरिपात गेला आहे, आता रब्बी हंगाम तरी हाती येईल का, हा प्रश्‍न मनातच दडवत नव्या आशेने व चैतन्याने पुरंदर तालुक्‍यातील बळीराजा “रब्बी’ हंगामाच्या तयारीला लागला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे. घेवडा, बाजरी, फळबागा, पालेभाज्या वाहून गेल्या तर अनेक ठिकाणी जादापावसामुळे त्या सडल्या परिणामी बाजारात दरही गगनाला भिडले आहेत; परंतु या आगताने न कोलडमता बळीराजा काळ्या आईची ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने मशागीच्या कामा व्यस्त आहे. शेतातील बाजरीचे व इतर निघालेल्या पिकांची रिकामी झालेली शेती मशागत करीत असून सध्या रब्बी हंगामातील पेरणीच्या तयारीला लागला आहे.

गेल्यावर्षी खरीप हंगातील पिके, फळे तोडणीला आला असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हाताचा गेला. त्या पावसामुळे जमिनीतील ओलावा अनेक दिवस कायम होता त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी उशीरा झाल्याने ते उशीरा हाती आले. पीक दमदार आल्याने दोन पैसे जादा मिळतील अशी शेतकऱ्यांना आशा होता.

मात्र, या आशेवर करोनाने व लॉकडाऊनने पाणी फेरले. पीक, फळे बाजारात विक्रीसाठीच न गेल्याने अनेकांच्या शेतातच ती सडली तर अनेक शेतकऱ्यांनी ती रस्त्याच्या कडेला टाकून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले. तरीही न खचता प्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके घेतली तीही ढगफुटी सदृश्‍य पावसाने हातून हिरावून घेतले.

मात्र, कितीही संकटे आले तरीही न डगमगता किंवा न मोडता तो रब्बीच्या तयारीला लागला असल्याने कधीही न रडता प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची प्रेरणा प्रत्येक व्यावसायिकासह सामान्य माणसाने आत्मसात करणे गरजेची आहे.

वाटाणा यावर्षी तरी तारणार का?
रब्बी हंगामात पुरंदर तालुक्‍यातील शेतकरी फळबागा बरोबरच ज्वारी, गहू, हरभरा त्याचबरोबर पुरंदरचा प्रसिद्ध व शेतकऱ्यांना रोख पैसा मिळवून देणारा वाटाण्याचा हंगाम गेल्यावर्षी वाय गेला असला तरी या वर्षी त्याची भर काढण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. किमान यावर्षी तरी वाटाणा आर्थिक घडी सुधरण्यास हातभार लावेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.