मुंबई – सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची करोनाची चाचणी करण्यात आली होती. बालसुब्रमण्यम यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यासंदर्भातील माहिती त्यांचा मुलगा एस.पी. चरण यांनी दिली आहे.
‘माझ्या वडिलांसाठी आपण प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद..! आता माझे वडील ठीक असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती चरण यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
SP Charan has rubbished rumours claiming that his father, veteran singer #SPBalasubrahmanyam, has tested #Covid19 negative, & informed that the playback icon is still on life support. Charan issued a video message on Monday requesting everyone to refrain from rumour-mongering. pic.twitter.com/gcRDXjPSmv
— IANS Tweets (@ians_india) August 24, 2020
एस. पी. बालसुब्रमण्यम यांना करोनाची सौम्य लक्षणे दिसली होती, परंतु नंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यामुळे त्यांना चेन्नई मधील एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबद्दल स्वतः बालसुब्रमण्यम यांनी सोशल मीडियावर माहिती दिली होती.
ते म्हणाले कि, ‘गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नाही. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा माझा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे’. असं बालसुब्रमण्यम व्हिडीओ मध्ये म्हणाले.