सुप्रसिद्ध अभिनेते ‘दिलीप कुमार’ रुग्णालयात दाखल; पत्नी सायरा बानो म्हणाल्या…

मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ, सुप्रसिद्ध आणि दिग्ज अभिनेते ‘दिलीप कुमार’ त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटत असतात. ते त्यांच्या तब्येतीबद्दल अनेकदा याच माध्यमातून अपडेटही देतात. दरम्यान, आज पुन्हा एकदा दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना काहीशी काळजीत पाडणारी बातमी समोर आली आहे.

दिलीप कुमार यांना नुकतंच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी-अभिनेत्री ‘सायरा बानो’ यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. 98 वर्षीय दिलीप कुमार यांना रेग्युलर हेल्थ चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या तब्येतीत सुधारणा असून आज रविवारी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता सायरा बानो यांनी वर्तवली आहे.

“दिलीप साब यांची प्रकृती आधीपेक्षा चांगली आहे. त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळेल..” असं सायरा बानो यांनी सांगितलं. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने या बद्दल माहिती दिली आहे. सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. आणि अश्यातच दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे चाहत्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निराम झाले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.