हडपसर : तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत

एसटी बस पालखी रथावर फुलांची उधळण करीत केले स्वागत

हडपसर (प्रतिनिधी) – जगतगुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका एसटी शिवशाही बसने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. आज सकाळी हडपसर गाडीतळ येथे पालखी रथ आले असता परिसरातील भाविकांनी फुलांची उधळण करत स्वागत केले.

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज हडपसर गाडीतळ येथून सासवड रस्त्याने तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे-सोलापूर महामार्गाने पंढरपुरकडे मार्गस्थ झाला. दरम्यान आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
एसटीच्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना हडपसर गाव येथील हडपसर मंडल अधिकारी व तलाठी यांच्या वतीने तर गाडीतळ येथे काही भाविकांनी व भक्तांनी शिवशाही पालखी रथावर फुलांची उधळण केली.

संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या नामाचा जयघोष करत स्वागत केले. शिवशाही बसला फुलांची आरास करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर व जगतगुरू तुकाराम महाराज पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आज हा सोहळा बस मधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. या सोहळ्याचे स्वागत हडपसर, मांजरी, शेवाळेवाडी येथील लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत केले.

अनेक ठिकाणी लोक सामाजिक अंतर राखत संत तुकाराम व माउलींच्या रथाला नमस्कार करताना दिसून येत होते. रथावर फुले उधळून आपली या दोन्हीं संतांच्या पालखी सोहळ्याविषयी असलेली भक्ती भाविक व्यक्त करत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.