शॉपिंग मॉलमध्ये नागरिकांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत!

पुणे  -शहरात करोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील सर्व दुकानांसह आजपासून शॉपिंग मॉलदेखील सुरु करण्यात आले आहेत. यावेळी मॉलमध्ये नागरिकांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले.

शहरातील सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत उघडी राहणार आहे. तसेच हॉटेल रात्री 10 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यात येणार आहे. अभ्यासिका, ग्रंथालय सुध्दा 50 टक्के उपस्थितीत सुरु राहणार आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.