सोरतापवाडी- तरडे येथे संत सोपानदेव पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. संत सोपानदेव यांची पालखी पचंक्रोशी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाली आहे. तेरा ते चौदा जिल्ह्यांतून वारकरी पायी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. पचंक्रोशी प्रदक्षिणाचे हे पाचवे वर्ष आहे. सोपानदेव पालखीचा दुपारचा विसावा आळंदी म्हतोबांची येथून आटोपून तरडेकडे मार्गस्थ होताना कुरकुंडेवस्ती येथे विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या वतीने भाजपचे काळूराम कुरकुंडे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी माजी उपसरपंच युवराज काळे, पोपट कुरकुंडे, भाविक उपस्थित होते. काळूराम कुरकुंडे यांनी सोपानदेवाची पालखी गावापर्यंत नेली. पालखी भैरवनाथ मंदिरात प्रवेश करताच ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख माऊली महाराज कदम व बापू महाराज डफळ यांचे स्वागत करण्यात आले. ह.भ.प. किसन बनकर, प्रकाश काळे,दत्तात्रय मेमाणे, पांडुरंग कोकाटे, चंद्रकांत काळे, आत्माराम मेमाणे, नामदेव गडदे, महिला सहभागी झाल्या होत्या. सोपान काका पादुकाची आरती झाल्यानंतर पालखी सोहळा रात्री मुक्कामासाठी डाळिंब विठ्ठल बनाकडे मार्गस्थ झाला.