भारतभ्रमणाला निघालेल्या अरोरा यांचे स्वागत

नेवासाफाटा  – सायकलवर भारतभ्रमणाला निघालेल्या अजमेर येथील अंकित अरोरा या 29 वर्षीय युवकाचे नेवासा येथे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या परंपरेचे व संस्कृतीचे दर्शन घडल्याचा आनंद व्यक्त करत भारतीय संस्कृती महान असल्याचे प्रतिपादन सायकलवर भारतभ्रमण करणारे अंकित अरोरा यांनी यावेळी झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना केले.

अंकित अरोरा या युवकाने दि.27 ऑगस्ट 2017 या दिवशी राजस्थान राज्यातील जयपूर येथून सायकलवर भारतभ्रमणास प्रारंभ केला. संपूर्ण भारतात भ्रमण करून देशातील असलेली महान संस्कृतीचा अभ्यास करून प्रांत व त्या भागातील नागरिकांशी सुसंवाद साधून तेथील परंपरा संस्कृती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सायकलवर भारतभ्रमण करण्यासाठी आपण सर्वप्रथम दक्षिणेकडून सुरुवात केली असून आता दक्षिण यात्रा पूर्ण केली आहे. महाराष्ट्रात मराठी संस्कृतीचा अभ्यास करून उत्तर भारत भ्रमण करणार आहोत, भारतभ्रमण करतांना मला प्रत्येकाडून आपुलकीची वागणूक सहकार्य, मोठी मदत मिळाल्याने सारे भारतीय माझे बांधव आहे या प्रतिज्ञेची प्रचिती आली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी विजय गांधी, अमृत फिरोदिया, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार,अरुण देशपांडे,भाजपचे अशोक ताके, समर्पण फाऊंडेशनचे डॉ. करणसिंह घुले, दत्तात्रय सरकाळे, चित्रकार भरतकुमार उदावंत, श्रीपाद देशपांडे, सतीश लोखंडे, आदित्य चव्हाण, जैन संघटनेचे मनोजकुमार भोसे, दुर्गादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष अजय पठाडे, दीपक परदेशी, तेजस पठाडे, सार्थक पठाडे, संतोष भागवत यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.