बावधन परिसरात कृषिदूतांचे स्वागत

कणूर, कडेगांवमध्ये कृषिदूत करणार शेतीविषयक मार्गदर्शन

वाई -कणूर आणि कडेगाव येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव अभ्यास कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी कराड शासकीय कृषी महाविद्यालयातून कृषिदूत आले आहेत. कणूर तसेच कडेगाव येथे ग्रामपंचायत, शेतकरी व ग्रामस्थांकडून त्यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले.

कृषिदूतांच्यावतीने शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती, नवीन आधुनिक तंत्रज्ञान, शेती उद्योग व्यवसाय, रासायनिक खतांचा योग्य वापर व इतर शेतीपूरक बाबींविषयी आगामी चार महिने मार्गदर्शन करणार आहेत. तसेच काही गोष्टी प्रगतशील शेतकऱ्यांकडूनही शिकणार आहेत. या कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. बी. पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. डी. एस. नावडकर, डॉ. एम. एस. शिर्के, अभिजित जाधव, रोहित जाधव, विकास काळे, सुरज चौगुले, अजित पवार, यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, यावेळी सरपंच सौ. बेबी राजपुरे, संपत राजपुरे, उपसरपंच सुनील मोरे, कृषी सहाय्यक बोडके मॅडम, हरिदास राजपुरे, कृषी मित्र प्रवीण मतकर, ग्रामसेवक व कणुर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. कडेगांवात कृषिदूतांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, कराड येथील चतुर्थ वर्षात शिकत असलेले कृषीदूत राहुल कांबळे, वैभव क्षीरसागर, ऋषिकेश लांजेकर, महेश कचरे, रणजित राऊत हे कडेगावमध्ये आलेल्या टीममध्ये सहभागी आहेत.

कृषिदुतांच्या स्वागतसमारंभी गावाचे सरपंच समींद्रा जगताप, उपसरपंच दौलतराव दुधे पाटील, कडेगावचे कृषी अधिकारी शिंदे, ग्रामसेविका धायगुडे, प्रगतशील शेतकरी प्रमोद मुरूमकर, शेखर पवार, शरद भोसले, शेखर पवार व इतर शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन कृषिदूत ऋषिकेश लांजेकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.