#KheloIndia2020 : वेटलिफ्टिंगमध्ये मयूरी देवरेने पटकावलं रौप्यपदक

आसाम/गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये वेटलिफ्टिंगमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणा-या मयुरी देवरे हिने रौप्यपदक तर रूचिका ढोरे हिने कांस्यपदक जिंकले आहे. तर याच स्पर्धेत कर्नाटकच्या अक्षता कमाती सुवर्णपदक पटकावलं आहे.

स्पर्धेतील २१ वर्षाखालील गटात मुलींच्या ८१ किलो वजनी गटात मयुरी देवरे हिने रौप्यपदक मिळवले. तिने स्नॅचमध्ये ७६ किलो तर क्लिन व जर्कमध्ये १०५ किलो असे एकूण १८१ किलो वजन उचलले.

याच स्पर्धेत रूचिका ढोरे हिने ब्राँझपदक पटकावलं. तिने स्नॅचमध्ये ६५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८० किलो असे एकूण १४५ किलो वजन उचलले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here