वर्क फ्रॉम होम मुळे वजन वाढले

अमेरिकेत ऑनलाईन हेल्थ कंपन्यांच्या उलाढालीत दुप्पट वाढ

वॉशिंग्टन – गेल्या वर्षभराचा कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये करोना महामारी च्या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम संस्कृती रुजल्यामुळे तेथील नागरिकांना आता वजन वाढण्याची चिंता सतावत असून त्यामुळे वजन कमी करण्याच्या योजना पुरस्कृत करणाऱ्या ऑनलाइन हेल्थ कंपन्यांच्या उलाढालीत दुप्पट वाढ झाली आहे महामारीच्या काळातील लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे सर्वसामान्य नागरिकांची दिनचर्या बिघडून गेली आहे.

खाण्यापिण्याच्या सवयी आणि झोपेच्या सवयी बदलून गेल्या असल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होत असून बहुतांशी नागरिकांना वजन वाढण्याची चिंता सतावत आहे आता अमेरिकेत पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा नेहमीच्या पद्धतीने काम सुरू करत असताना सर्वांना फिट राहणे आवश्यक आहे त्यामुळे अनेक नागरिकांनी ऑनलाइन हेल्थ कंपनीच्या संपर्कात जाऊन वजन कमी करण्यासाठी उपाय योजना लागू केल्या आहेत.

त्याचा परिणाम म्हणून या कंपन्यांच्या उलाढालीत दुप्पट वाढ झाली आहे अमेरिकेतील नोम नावाची एक कंपनी फक्त पाच हजार रुपयांमध्ये आरोग्यविषयक प्लान देत असून गेल्या वर्षीपेक्षा या कंपनीच्या ॲप डाऊनलोडची संख्या तब्बल 40 लाखांनी वाढली आहे वेट वोचर्स यासारख्या डिजिटल कंपन्यांची उलाढालही 16 पटीने वाढली आहे या कंपनीच्या सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आता ही संख्या 46 लाखांवर गेली आहे.

वर्क फ्रॉम होमचा आपला अनुभव सांगताना मिशिगन येथील लेसिंग मध्ये राहणारी एक सरकारी नोकरदार महिला जेसिका शॉर्टने दिलेल्या माहितीप्रमाणे वर्क फ्रॉम होम मुळे तिच्या वजनामध्ये तब्बल 15 किलो वाढ झाली होती घरातील कोणतेही कपडे तिला बसत नव्हते लॉक डॉन मुळे बाहेर जाऊन कोणत्या प्रकारचा व्यायाम करणे शक्य नसल्याने तिने ऑनलाईन कंपन्यांच्या संपर्कात जाऊन एक कार्यक्रम निवडला या आरोग्य कार्यक्रमाचा तिला लाभ झाला.

पूर्ववत कार्यालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा पूर्वीच्या वाजनापर्यंत पोहोचवण्याचा तिचा उद्देश आहे अमेरिकेत अशा प्रकारे ऑनलाईन हेल्थ कंपन्यांची उलाढाल वाढत असतानाच डाएटचा सल्ला देणाऱ्या कंपन्यांची उलाढालही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात वाढत आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.