भुषण पॉवरकडून 3,800 कोटींना गंडा

नवी दिल्ली – नीरव मोदी यांच्या कोट्यवधीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर भुषण स्टील ऍण्ड स्टील लिमिटेड कंपनीने पंजाब नॅशनल बॅंकेला 3,800 कोटींहून अधिक रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीएनबीने रिर्झव्ह बॅंकेकडे तक्रार नोंद केली असून सीबीआयकडे तपास सोपविण्यात आला आहे. भूषण स्टीलही कंपनी आधीच कर्जबाजारी झाली असून पंजाब नॅशनल बॅंकेत पैशाची मोठी अफरातफर त्यांनी केली असल्याचा आरोप केला आहे.

हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बॅंकेत घोटाळा केल्याचे प्रकरण ताजे असताना आता हे नवीन प्रकरण समोर आले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या दुबई शाखेतून 345.74 कोटी, तर हॉंगकॉंग शाखेतून 267.90 कोटी रुपये भूषण पॉवर आणि स्टीलने काढले होते. तसेच भारतातील अनेक शाखांमध्ये सुमारे 3,191.51 कोटी रुपयांची अफरातफर केली आहे. ही रक्कम परत मिळवण्यासाठी पंजाब नॅशनल बॅंक प्रयत्न आहेत. तसेच या घोटाळ्यात बॅंकेतील कोणते अधिकारी गोवले आहेत का याचा शोध घेतला जातो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.