23 मार्च ते 29 मार्च 2020 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे
शनि, शुक्र, हर्षल. तृतियेत राहूू, नवमातमंगळ, गुरू व केतू, दशमात प्लुटो व शनी, लाभात बुध व नेप्युचून आहे. मनोविग्रह ठेवून प्रत्येक कृती करणे गरजेचे आहे. कामात निश्चय आवश्यक असेल. हितचिंतकांच्या मदतीने रेंगाळलेली कामे मार्गी लावू शकाल. घरात वातावरण चांगले राहील.
-अनिता केळकर (लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)
मेष: नवीन कामे मिळतील
सप्ताहात तुम्हाला निश्चयाने मार्गक्रमण करावयाचे आहे. हे लक्षात ठेवा. कोणत्याही मोहाला बळी न पडता कामाचे नियोजन करा. व्यवसायात नवीन कामे मिळतील. हितचिंतकांच्या मदतीने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल, वरिष्ठांची मर्जी राहील. महत्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. त्यासाठी विशेष सवलत देतील. मुलांच्या प्रगतीची बातमी सुखावह राहील.
शुभ दिनांक : 23, 27, 28, 29.
वृषभ :उलाढाल वाढेल
अंधारात आशेचा किरण दिसल्याने आशावाद जागृत होईल. व्यवसायात जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. विक्री व फायद्याचे प्रमाण वाढेल. पैशाची चिंता कमी होईल. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करणे फायद्याचे राहील. प्रगतीचा वेग अपेक्षापेक्षा कमी राहील. तरीही लवचिक धोरण स्वीकारून पुढे जा. अनावश्यक खर्चाला फाटे द्या. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26, 29
मिथुन :नवीन कामे दृष्टीक्षेपात
कामातील मरगळ दूर करून महत्त्वाची कामे मार्गी लावा. व्यवसायात हातातील पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करा. उधार उसनवार शक्यतो टाळा. नवीन कामे दृष्टीक्षेपात असतील. नोकरीत अति आत्मविश्वास टाळावा. वरिष्ठ व सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल ही अपेक्षा नको. घरात हौसे मौजेसाठी खर्च वाढेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतिकडे लक्ष ठेवावे लागेल. प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण साजरे होतील.
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26, 27, 28.
कर्क : कामे मार्गी लागतील
रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात पूर्वीच्या कामांचा व जुन्या हितसंबंधांच्या नवीन काम मिळवण्या करता बराच उपयोग होईल. केलेल्या कामाचे ताबडतोब पैसे मिळतील ही अपेक्षा नको. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होईल. घरात तुमच्या विचारांना इतरांचा विरोध राहील. परंतु नंतर सहकार्य मिळेल. बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या. महिलांना मुलांकडून चांगली बातमी कळेल.
शुभ दिनांक : 16, 19, 20, 21.
सिंह : वरिष्ठांचा सल्ला घ्यावा
अडचणींवर यशस्वीपणे मात करून प्रगती कराल. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती संपवा. नवीन योजना तुम्हाला आकर्षित करतील. परंतु त्यातील धोक्यांचाही विचार आधी करा. नोकरीत आळसाने कामे लांबवलीत तर त्रास तुम्हालाच होईल. नवी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फार चिकित्सा करू नये. हातातील पैशाची बचत करावी. घरात गरज असेल तसे खर्च करावेत. विद्यार्थ्यांनी शंकांचे निरसन वेळीच करावे.
शुभ दिनांक : 23, 27, 28, 29.
कन्या :जुनी येणी वसूल होतील
विचार व कृती यांची सांगड घालून कामात गती घ्याल. व्यवसायात आधुनिक मार्गाचा अवलंब करून उलाढाल वाढवाल. तुमचा दृष्टीकोन व्यापक राहील. त्यामुळे परिस्थितीनुरूप बदल कराल. हितचिंतकांची मदत मिळेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची चिंता मिटेल. सर्व जण कामाचे कौतुक करतील. घरातील व्यक्तींच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरा होईल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.
शुभ दिनांक : 24, 25, 26, 29.
तुळ : प्रकृतीची काळजी घ्यावी
“नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात कामात सजगवृत्ती ठेऊन कृती करावी. आतिविश्वास टाळावा. हातातील कामे वेळेत संपवण्याचा विशेष प्रयत्न करावा. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही ठोस उपाय योजावेत. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल, तरीही कामांची पूर्तता करावी लागेल. घरात उगीचच चिडचिड न करता सलोख्याचे वातावरण ठेवावे. स्वास्थ्य जपण्यासाठी विशेष काळजी घ्यावी.
शुभ दिनांक : 23, 27, 28.
वृश्चिक : मानसिक स्वास्थ्य जपा
कामाचे वेळी कामं करून इतर वेळी आराम करण्याकडे कल राहील. व्यवसायात पूर्वीच्या कामाचे पैसे मिळतील. जादा भांडवलाची सोयही होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चौफेर नजर ठेवावी. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. नोकरीत किचकट कामे सहकाऱ्यांवर ढकलून आवडणारी कामे कराल. जोड धंद्यातून विशेष कमाई करता येईल. घरात गृह सजावटीसाठी बरेच पैसे खर्च होतील. तरूणांचे विवाह ठरतील. सुवार्ता कळेल.
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26, 29.
धनु :तडजोडीचे धोरण हितावह
कामचा तुमचा झपाटा उत्तम राहील. तरीही वेळ मिळेल तेव्हा जीवनाचा आनंद घेण्याकडे कल राहील. व्यवसायात मनोकामना सफल होतील. कामाचा वेग व कामाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न राहतील. पैशाची चिंता नसेल. नवीन कामे असतील. नोकरीत तुमच्या कामाचे महत्त्व वरिष्ठांना जाणवेल. त्यामुळे ते तुम्हाला खुष ठेवतील. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत. याची दक्षता घ्या.
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26, 27, 28
मकर :कामाचा हुरूप वाढेल
कामाला योग्य प्रतिसाद मिळाल्याने तुमचा हुरूप वाढेल. कठीण कामांतही यश संपादन कराल. व्यवसायात आर्थिक स्थिती फारशी चांगली नसली तरी खेळत्या भांडवलावर कामे पूर्ण करता येतील. निकडीच्या गरजा भागवता येतील. जुनी येणी वसुलीवर लक्षे केंद्रित करा. घरात नको त्या कामात बराच वेळ जाईल. निरर्थक खर्च आटोक्यात आणण्यात यशस्वी व्हाल. नातेवाईकांसमवेत वेळ मजेत घालवाल.
शुभ दिनांक : 23, 24, 25, 26, 28, 29.
कुंभ : हितसंबंध जोडले जातील
स्वतःच्या तंत्राने काम करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही खुष असाल. व्यवसायात व्यवहार दक्ष राहून निर्णय घ्याल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामांची पूर्तता कराल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत कामात फायदा करून घेण्याचा मानस राहील. परंतु त्याची वाच्यता करू नका. कामातील बेत गुप्त ठेवा. सहजीवनाचा आनंद घेता येईल. वातावरण आनंदी राहील.
शुभ दिनांक : 23, 24, 26, 27, 28, 29.
मीन :खरेदीचे मनसुबे ठरतील
स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा तुमचा अट्टहास उफाळून येईल. मात्र चुकीच्या मार्गाने व जादा कामाचे स्वरूप ओळखून कृती करा. व्यवसायात परिणामांचा विचार करून पावले टाका. कामाचा वेग वाढवण्यासाठी जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत नवीन संधी चालून येईल. फायदा घ्या. जोडधंद्यातून जादा कमाई होईल. अनुकूल वातावरण नोकरीत राहील. छोटासा समारंभ ठरेल.
शुभ दिनांक : 24, 25, 26, 27, 28, 29.