साप्ताहिक राशी-भविष्य : 22 ते 28 एप्रिल 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

लग्नी रवी, हर्षल, धनस्थानात मंगळ, तृतीयेत राहू, अष्टमात गुरू वक्री भाग्यात शनी, केतू व प्लुटो वक्री तर व्ययात बुध व शुक्र आहेत. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्याल त्यावर यश अवलंबून राहील. बेधडक निर्णयाचा सप्ताहात लाभ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. सुखद प्रसंग (जीवनातील) साजरे कराल.

प्रगतिपथावर राहाल
ग्रहांची मर्जी आहेच तेव्हा प्रगतिपथावर राहाल. व्यवसायात तुमच्या बेधडक निर्णयाचा उपयोग होईल. नवीन कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी विशेष लक्ष राहील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. कामानिमित्ताने प्रवासयोग घडतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात कौटुंबिक जीवनातील सुखद प्रसंग साजरे कराल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. सामूहिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल.
शुभ दिनांक : 24, 25, 26, 27, 28.

 


मानसिक समाधान
संयम व विचार यांचा योग्य समन्वय साधून कामात निर्णय घ्याल. व्यवसायात स्वतःची कुवत ओळखून धाडस करा. पैशाचे व्यवहारात दक्ष रहा. नोकरीत कार्यतत्पर रहा. गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळा. महत्त्वाच्या कामांना विशेष प्राधान्य द्याल. घरात कर्तव्यपूर्तीला प्राधान्य राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल्याने मानसिक समाधान मिळेल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.
शुभ दिनांक : 22, 23, 26, 27, 28.

 

 


मनोकामना पूर्ण होईल
तुमचा उत्साह व आनंद द्विगुणीत करारी घटना घडेल. व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. पैशाची आवकही चांगली असेल. मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान. नोकरीत तुमच्या शब्दाला मान मिळेल. अंगी असलेले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील.. प्रकृतीमान सुधारेल.
शुभ दिनांक : 24, 25


यश संपादन कराल
सभोवतालच्या
परिस्थितीचा व माणसांचा अचूक अंदाज येईल त्यामुळे थोडे निराशही व्हाल. परंतु मनोबल उत्तम राखलेत तर येणाऱ्या अडचणींवर मात करून यश संपादन कराल. व्यवसायात सहनशीलतेची कसोटी असेल, पैशाची चणचण राहील. नवीन कामे डोळ्यासमोर असतील. त्यामुळे नुसतीच तुमची धावपळ होईल. नोकरीत जीभेवर साखर पेरून सहकाऱ्यांशी वागावे लागेल. व गोड बोलून कामे करून घ्यावी लागतील. शुभ दिनांक : 22, 23, 26, 27, 28.


यशाचा झेंडा रोवाल
अशक्‍यप्राय गोष्ट शक्‍य करून दाखवून सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यवसायात विरोधकांचा विरोध मावळेल व तुमच्या कामांना तत्त्वतः मान्यता मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामात यशाचा झेंडा रोवाल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. घरात प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. पूर्वी ठरवलेले समारंभ पार पडतील. तुमची मनातील सुप्त इच्छा साकार होईल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल.
शुभ दिनांक : 22, 23, 24, 25.


परदेशगमनाची संधी
ग्रहांची साथ मिळाल्या आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करून उलाढाल वाढवण्याचे बेत सफल होतील. जुनी कामे चालू ठेवून नवीन कामेही हाती घ्याल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल कराल. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील कामाची नवीन जबाबदारीही पेलावी लागेल. परदेशव्यवहार व परदेशगमनाची संधी येईल.
शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26, 27, 28.


वरिष्ठांची मदत मिळेल
आनंद देणारी बातमी कळेल. तुमचा उत्साही स्वभाव व वातावरणाची साथ मिळाल्याने कामातील प्रगतीला वेग येईल. सकारात्मक दृष्टीकोन राहील. व्यवसायात अंथरूण पाहून पाय पसरा. पैशाचा ताळेबंद मांडून त्याप्रमाणे कृती करा. नोकरीत सहकारी व वरिष्ठांची मदत कामात मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. नवीन वाहन, जागा घेण्याचे तुमचे स्वप्न प्रत्यक्ष साकार होईल. घरात कुटुंबासह सहल काढाल.
शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26, 27, 28.कामात यश मिळेल
स्वभावाविरुद्ध वागून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का द्याल. आशावादी दृष्टीकोन राहील. व्यवसायात नवीन योजना प्रोत्साहीत करतील. कामात नवीन तंत्रज्ञान वापरून फायद्याचे प्रमाण वाढवाल. कामात हितचिंतकांची मदत मिळेल. धोके पत्करून उडी घेण्याचे धाडस कराल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांची मदत मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. घरात मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. तरुणांचे विवाह ठरतील.
शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26, 27, 28.नवीन योजना आखाल
परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कार्यप्रणालीत बदल करा. यश हमखास मिळेल. व्यसायात तुमच्या स्वातंत्र्यप्रिय स्वभावामुळे बेधडक निर्णय घेऊ शकाल. कामात एक नवा दृष्टीकोन मिळेल. पौशाची चिंता मिटेल. रेंगाळलेली कामेही मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कामात जादा सवलती व अधिकारही मिळतील मात्र त्याचा गैरवावर करू नये. घरात कौटुंबिक सुखसोहळ्यात सहभागी व्हाल. आनंद मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
शुभ दिनांक : 24, 25, 26, 27, 28.वरिष्ठांची मर्जी राहील
धाडस करून नवीन पावले टाकाल व यशही मिळेल. आशावादी दृष्टीकोन तुमच्या जीवनाला कलाटणी देईल. व्यवसायात रेंगाळलेली कामे पूर्ण करून नवीन कामांकडे लक्ष द्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. पैशाचा विनियोग भविष्याची तरतूद करण्यासाठी योग्यप्रकारे कराल. नोकरीत कामात बिनचूक राहून वेळेत कामे उरका. वरिष्ठांशी योग्य ते संबंध राखून कामातील प्रगती कळवा. जोडधंद्यातून लाभाची शक्‍यता.
शुभ दिनांक : 22, 23, 26, 27, 28.


कामात प्रगती
तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात प्रयत्न व नशिबाची साथ मिळेल. कामात प्रगती होईल. खेळत्या भांडवलाची तरतूदही होईल. नोकरीत तुमच्या कामाला मागणी राहील. मात्र कामात व कामासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नात कोणतीही कसूर करू नका. घरात नवीन खरेदीचे बेत सफल होतील. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. कुटुंबासमवेत छोटीशी सहल काढाल. तरुणांना योग्य जोडीदार भेटेल.
शुभ दिनांक : 22, 23, 24, 25.


पैशाची ऊब राहील
तुमचा उत्साह व आशावादी दृष्टीकोन वाढवण्यास पूरक ग्रहमान लाभेल. व्यवसायात महत्त्वाकांक्षा व जिद्द यांचे जोरावर नवीन कामे हाती घ्याल. पैशाची ऊब राहील. नोकरीत प्रतिष्ठा मिळवून देणारे काम कराल. वरिष्ठ नवीन कामाची संधी देतील. नवीन ओळखी होतील. मनोकामनाही पूर्ण होतील. घरात इच्छा आकांक्षा पल्लवीत करणारे वारे वाहतील. मित्र-मैत्रिणींसमवेत वेळ मजेत जाईल. मानसिक शांतता मिळेल. शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26, 27, 28.

 


 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.