साप्ताहिक राशि-भविष्य (20 ते 26 जानेवारी 2020 पर्यंतचे ग्रहमान )

20 ते 26 जानेवारी 2020 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे
मेषेत हर्षल. मिथुनेत राहू, वृश्‍चिकेत मंगळ, धनूमध्ये गुरू, शनी, केतू व प्लुटोत, मकरेत रवी शनि, जो 25 जानेवारीला येत आहेत. व्यवसायात कामाची उत्तम संधी चालून येतील. कामे वेळेत व मनासारखी होतील. मुलांकडून सुवार्ता कळेल. आरोग्य उत्तम राहील.
-अनिता केळकर (लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)


मेष: आरोग्य चांगले राहील.
व्यवसायात नोकरीत कामाच्या उत्तम संधी चालत येतील. संघर्ष /वादविवाद टाळण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची मने जिंकून घ्याल. मनाप्रमाणे कामे करता येतील. तसेच खर्चही मनाप्रमाणे कराल. आरोग्य चांगले राहील. महिलांना मुलांकडून प्रगतीच्या बातम्या समजतील. नोकरदार महिला कर्तव्य तत्पर राहतील. आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल.
शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26.

 


वृषभ : योग्य मार्गदर्शन
नवीन आशावाद तुम्हाला उत्साही ठेवेल. हव्या त्या कामात योग्य वेळी योग्य व्यक्‍तिंची मदत मिळाल्याने कामे सुकर होतील. व्यवसायात कामपुरती पैशाची सोय झाल्याने कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठित व्यक्‍तिंची कामासाठी आश्वासने मिळतील. नोकरीत वरिष्ठ कामाचे योग्य मार्गदर्शन करतील. कामासाठी प्रवासयोग संभवतो. नवीन ओळखी होतील. घरात सर्वांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतील.
शुभ दिनांक : 13, 14, 15, 16, 17.

 


मिथुन :अर्थ प्राप्ती होईल
ग्रहांची साथ मिळेल. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे चीज आता होईल. नवीन अनुभव येतील. कामात छान यश मिळेल. अर्थ प्राप्ती होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. कृतीवर जास्त भर द्याल. महिलांना मनःशांती मिळेल. आनंद वार्ता कळतील. आवडीच्या क्षेत्रात मन रमेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान.
शुभ दिनांक : 22, 23, 24.कर्क : कल्पकतेची जोड मिळेल
तुमच्या अंगी आलेले सुप्त कालगुण दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. कर्तव्याला कल्पकतेची जोड मिळेल. व्यवसायात पूर्वीच्या अनुभवांचा चांगला उपयोग होईल. नवीन कामे मिळतील. कामातील बेत मात्र गुप्त ठेवा. नोकरीत पैशाच्या मोहमयी पाशापासून चार हात लांब रहा. कामात बिनचूक राहून कामे वेळेत पूर्ण करा. महिलांची अपेक्षित कामे पूर्ण होतील. खर्चांचे प्रमाण मात्र वाढेल. प्रकृतीमान चांगले राहील.
शुभ दिनांक : 20, 21, 25, 26.


 


सिंह : जादा अधिकार, सवलत
“इच्छा तेथे मार्ग’ हे सार्थ ठरेल. व्यवसायात रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन कामाची संधी चालून येईल. खेळत्या भांडवलाची सोयही होईल. व्यवहारात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील. त्यासाठी जादा अधिकार व सवलतही देतील. कामामुळे ताण वाढेल. महिलांना इतरांकडून व घरातून मिळणारा अनुभव मोलाचा असेल. शुभकार्ये ठरतील. प्रकृतीची काळजी घ्यावी.
शुभ दिनांक : 20, 21, 22, 23, 24.


 


कन्या : वादविवादापासून अलिप्त
जिद्द व चिकाटीच्या जोरावर महत्वाची कामे धसास लागतील. आर्थिक प्रगती उत्तम राहील. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. चांगले बदल कामात घडतील. दगदग धवपळ वाढेल. नोकरीत कर्तव्यपूर्तीसाठी वेळ व पैसा खर्च करू शकाल. मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर कराल. कामे यशस्वी होतील. महिलांना परोपकाराची संधी चालून येईल. नवीन वस्तू खरेदी करता येतील. नोकरदार महिलांचा आत्मविश्‍वास वाढेल.
शुभ दिनांक : 20, 21, 22, 23, 24, 25, 26.

 

 


तुळ :पुढे जाण्यासाठी धडपड
तुमच्या बुद्धी कौशल्याने तुम्ही येणाऱ्या अडचणींवर मात कराल. व्यवसायात नवीन शिकण्याची संधी मिळेल. अर्थप्राप्ती समाधानकारक होईल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. नोकरीत कामाचा उरक दांडगा राहील. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तुमचे व तुमच्या कामाचे महत्व इतरांना कळून येईल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मनाप्रमाणे कामे झाल्याचा आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला उत्तम ग्रहमान.
शुभ दिनांक : 20, 21, 22, 23, 24, 25, 26.

 

 


वृश्‍चिक :जादा कमाईची संधी
मानी व अहंमन्य स्वभावाला थोडी मूरड घातलीत, तर कामाचा आनंद मिळेल. व्यवसायात इतरांकडून कसे व कोणते काम करून घेता यावर यशाची मदार अवलंबून राहील. कामात कार्यक्षमता वाढवण्याकडे कल राहील. पैशाची स्थिती चांगली राहील. नोकरीत तुमच्या कामाने तुम्ही इतरांची मने जिंकून घेऊ शकाल. वरिष्ठ व इतर सहकारी यांना तुमचे महत्व कळून येईल. जादा कमाईची संधी मिळेल.
शुभ दिनांक : 20, 21, 22, 23, 24, 25, 26.

 

 


धनु :नवीन नोकरी मिळेल
व्यवसायात नोकरीत अपेक्षित यश मिळेल. मनातील इप्सित साध्य होतील. कार्य तत्परता दाखवाल. व्यवसायात सामंजस्याने प्रश्‍न मार्गी लावाल. मिळालेल्या वेळ व संधीचा फायदा करून घ्याल. अर्थप्राप्ती चांगली होईल. नोकरीत तुमची आनंदी व समाधानी वृत्ती, कामाचा तणाव हलका करेल. वरिष्ठ व सहकारी मदत करतील बेकारांना नवीन नोकरी मिळेल. महिलांना गृहसौख्य उत्तम लाभेल. नवीन खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील.
शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26.

 


मकर : शेअर्स व्यवहारातून लाभ
व्यवहारी दृष्टीकोन ठेऊन कामात बदल कराल. व्यवसायात विस्ताराच्या कामांना फलद्रुप होतील. खेळत्या भांडवलाची तरतूद, बॅंका व हितचिंतकांची मदत होईल. प्रत्येक प्रश्‍न सामंजस्याने मार्गी लावाल. परदेश गमनाची संधी चालून येईल. नोकरीत कामे मार्गी लागल्याने मनावरचा ताण कमी होईल. बचतीकडे विशेष लक्ष द्याल. शेअर्स व्यवहारातून विशेष लक्ष संभवतो. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल.
शुभ दिनांक : 20, 21, 25, 26.

 

 


कुंभ :पैशाची चणचण राहील
ग्रहमान व वातावरणाची साथ मिळेल. व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. नशिबांची साथ मिळेल. अवघड व अशक्‍यप्राय कामात यश संपादन कराल. आर्थिकप्राप्ती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामात कर्तबगारी राखवण्याची संधी मिळेल. चांगली कार्य हातून घडतील. महिलांना कामात हुरूप येईल. सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगती करता येईल.
शुभ दिनांक : 20, 21, 22, 23, 24.


 


मीन : नवीन कामे मिळतील
तुमच्या आनंदी व स्वच्छंदी स्वभावाने तुम्ही इतरांना आपलेसे करून घेता याचा विशेष लाभ होईल. कर्तव्य पूर्तिकडे विशेष लक्ष द्याल. व्यवसायात वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करून कामे मार्गी लावाल. नवीन कामे मिळतील. नोकरीत नवीन कामे हाताळण्याची संधी मिळेल. परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. तरूणांचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना यशदायक.
शुभ दिनांक :20, 21, 22, 23, 24, 25, 26.

 


 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)