साप्ताहिक राशी-भविष्य

18 ते 24 फेब्रुु. 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 
मेषेत हर्षल व मंगळ, कर्केत राहू, वृश्‍चिकेत गुरु, धनू मध्ये शुक्र शनी व प्लुटो, मकरेत केतू, तर कुंभेत रवी, नेप्च्यून, बुध आहे. वरील ग्रहमान तुमच्या कामाचा उत्साह व हुरूप वाढविणारा राहील. अर्धवट कामे मार्गी लागतील. पैशाची सोय होईल. वातावरण सुखद व आनंदी राहील. चांगली बातमी कानावर येईल. 

जोडधंद्यातून कमाई 

ग्रहांची साथ हुरूप देईल. व्यवसायात पूर्णत्वास आलेली कामे पूर्ण होतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुमचा दृष्टिकोन सावध ठेवा. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत हव्यासापोटी एखादी कामाची जबाबदारी स्वीकारू नका. कुवत ओळखा. जोडधंद्यातून विशेष लाभ. घरात वातावरण आनंदी राहील. व्यक्‍तिगत जीवनात चांगली घटना घडेल. तरुणांनी मात्र विवाहबंधनात पडण्याची घाई करू नये. सामूहिक क्षेत्रात प्रगती व्हावी.
शुभ दिनांक : 18, 19, 20, 21, 22 

उसनवारी टाळा 

गंगाजळीला अनपेक्षित आलेल्या खर्चामुळे हात घालावा लागेल.व्यवसायात अनुकूल वातावरण लाभेल. कामाच्या नवीन योजना आकर्षित करतील. फायदा मिळवून देणाऱ्या कामांवर लक्ष द्या. नोकरीत ऐकीव गोष्टींवर विश्‍वास ठेवून मतप्रदर्शन करू नये. पैशाची उसनवारी टाळा. कामानिमित्ताने प्रवास योग. मोठ्या व्यक्‍तींच्या सल्ल्याचा योग्य उपयोग करा. महिलांनी स्वत:चे छंद जोपासावे.
शुभ दिनांक : 18, 19, 20, 21, 22,23 

चांगली बातमी कळेल 

“इच्छा तेथे मार्ग सापडेल’ तणाव कमी होऊन कामांना गती येईल. व्यवसायात चाकोरीबद्ध राहू कामे करा. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. प्रतिष्ठेला जपा. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून कामे करा. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. चांगली बातमी कळेल. घरात महिलांनी अपेक्षा न ठेवता काम केले तर लाभ होईल. भावनेच्या भरात वाहून न जाता योग्य निर्णय घ्या. प्रकृतीमान सुधारेल.
शुभ दिनांक : 18, 19, 20, 21, 22, 23, 24 

हितशत्रूंपासून सावध 

सभोवतालच्या व्यक्‍तींच्या स्वभावाची चुणूक दिसेल. “आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत’ याची दक्षता घ्या. व्यवसायात बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. कर्तव्याला प्राधान्य द्या. नोकरीत सहकारी व वरिष्ठांकडून अपेक्षा ठेवू नका. कामात चोख राहा. हितशत्रूंपासून सावध. घरात इतर लोकांच्या विचित्र वागण्याचा ताप सहन करावा लागेल. अशांतता मन अस्वस्थ करेल.
शुभ दिनांक : 18, 19, 20, 21, 22 

लाभ होईल 

कर्तव्य व इच्छा यांचा योग्य तो समन्वय साधून कामे करा. व्यवसायात अनुभवी व्यक्‍तींचा सल्ला मोलाचा ठरेल. नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामातून लाभ होईल. नोकरीत दिलेली आश्‍वासने पाळा. “स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ असा अनुभव येईल. मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतील. घरात मुलांच्या प्रगतीकडे व प्रकृतीकडे लक्ष द्या महिलांनी कामांना प्राधान्य द्यावे.
शुभ दिनांक : 20,21,22, 23, 24 

दगदग टाळा 

पैशाची तरतूद करण्यासाठी योग्य व्यक्‍तींचा सल्ला घ्या. अति हाव टाळा. व्यवसायात स्वत:ची कुवत ओळखून कामे स्वीकारा. अंथरुण पाहून हातपाय पसरा. नवीन संधी दृष्टीक्षेपात असतील. नोकरीत अनावश्‍यक दगदग धावपळ टाळा. दिलेला शब्द पाळा. वरिष्ठांची व सहकाऱ्यांची कामात मदत होईल. घरात मुलांच्या व इतर व्यक्‍तींच्या हौसमौजेखातर चार पैसे जादा खर्च होतील. नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.
शुभ दिनांक : 18, 19, 22, 23, 24 

कामात गुप्तता राखा 

कार्यतत्पर राहा. व्यवसायात कामात गुप्तता राखा. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. स्पर्धेत तगून राहण्यासाठी बाजारातील चढ-उतारांवर लक्ष ठेवा. नोकरीत तुमचा पवित्रा सावध ठेवा. स्वत:च्या कुवतीचा विचार केल्याशिवाय कामे स्वीकारू नका. वरिष्ठांची अवमर्जी होणार नाही याची काळजी घ्या. घरात तडजोडीचे वातावरण ठेवा. महिलांना व इतरांच्या गोष्टी पटल्या नाही तरी बोलून दाखवू नका.
शुभ दिनांक : 18, 19, 20, 21, 22 

प्रकृती सांभाळा 

“प्रयत्नांती परमेश्‍वर’ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात परिस्थितीनुरूप बदल करून प्रगती कराल. नवीन योजना व गुंतवणुक करण्यासाठी निष्णात व्यक्‍तींचा सल्ला घ्याल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामे वेळेत संपवून इतरांनाही कामात मदत कराल. तुमचे कामाचे व तुमचे महत्त्व वरिष्ठ व सहकारी यांना कळून येईल. जुने विकार बळावतील. प्रकृतीकडे लक्ष द्या.
शुभ दिनांक : 18, 19, 20, 21, 22 

ताण कमी होईल 

एकाच वेळी सगळीकडची कामे सुरू झाल्याने कुठे प्राधान्य द्यायचे हा संभ्रम राहील. तेव्हा महत्त्वाची व फायदा देणारी कामे आधी हाती घ्या. व्यवसायात पैशाची आवक चांगली राहील. जुनी येणी देता आल्याने मनावरचा ताण कमी होईल. नवीन कामाची योग्य आखणी व नियोजन भविष्यात लाभ देईल. नोकरीत कामाच्या मानाने समाधान नाही असे वाटेल. परंतु थोडी सबुरी ठेवा. महत्वाचे निर्णय घेऊ नका.
शुभ दिनांक : 20,21, 22, 23, 24 

मते गुप्त ठेवा 

मनावर संयम ठेवून वागा. व्यवसायात ध्येय धोरणे ठरवताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आश्‍वासन देताना पडताळणी करून मगच द्या. पैशाचे व्यवहारात दक्ष रहा. भावना व कर्तव्य यांची गल्लत करू नये. नोकरीत नवीन करार मदार तूर्तास पुढे ढकला. अनावधानाने हातून चूक होणार नाही याची काळजी घ्या. तुमची मते गुप्त ठेवा. प्रवासात बेसावध राहू नये. घरात इतर कामात व्यक्‍तींची होणारी मदत मोलाची ठरेल.
शुभ दिनांक : 18, 19, 22, 23, 24 

नरमाईने वागा 

अतिविचार करण्यापेक्षा कृती करा. व्यवसायात कामासाठी दिलेला शब्द पाळा. आर्थिक तणाव दूर करण्यासाठी विशेष परिश्रम घ्या. आवश्‍यकता भासल्यास कार्यपद्धतीत बदल घडवून कामांना गती द्या. नोकरीत स्वत:चा हेकेखोर स्वभाव नडेल. तरी वरिष्ठांपुढे नरमाईने वागा. “शब्द हे शस्त्र आहे’ लक्षात ठेवून बोला. घरात चार हात लांब राहूनच वागा. जुने वाद डोके वर काढण्याची शक्‍यता.
शुभ दिनांक : 20, 21, 24 

कामात दक्ष राहा 

आजचे काम आजच करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायात कोणताही महत्वाचा निर्णय निष्णात व्यक्‍तीचा सल्ला घेऊन करा. नवीन काम ओळखीतून मिळतील. प्रत्येक काम स्वयंसिद्ध राहून उरका. दुसऱ्यांवर विसंबून राहणे अपेक्षाभंग ठरेल. नोकरीत बदल व बदली तूर्तास नको. कामात दक्ष राहा. घरात आपल्याच माणसांकडून नवीन अनुभव येईल. बचतीचे धोरण स्वीकारा.
शुभ दिनांक : 18, 19, 22, 23 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)