नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मुकेश याची दया याचिका फेटाळण्याच्या विरोधातील याचिकेवर बुधवारपर्यत आपला निकाल न्यायालयाने स्थगित ठेवला.
न्या. आर भानुमती यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांच्या खडपीठाने हा निर्णय घेतला. राष्ट्रपती कोविंद यांन मुकेशचा दयेचा अर्ज 17 जानेवारी रोजी फेटाळला होता. या चार आरोपींना एक फेब्रुवारीला फाशी देण्याचे वॉरंट निघाले आहे. त्यापसून वाचण्याचा हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे.