महाळुंगे इंगळे – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे दोन मजली 1200 स्क्वेअर फूट अशा प्रशस्त जागेमध्ये सुरू झालेल्या “स्वामिनी कलेक्शन’ वस्त्रदालनामध्ये अत्यंत दर्जेदार, आकर्षक तसेच कलात्मक साड्या आणि कपड्यांचे असंख्य प्रकार व ते देखील माफक किमतीत त्याचसोबत लग्नाचा बस्ता बांधण्यासाठीही खास सोय उपलब्ध असल्याने आता महाळुंगे इंगळेकरांना लग्नाचा बस्ता, कपडे खरेदीसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरजच भासणार नाही हे मात्र नक्की.
महाळुंगे इंगळेसह परिसरातील नागरिकांसाठी भव्य वस्त्रदालन तसेच बस्त्याचे प्रमुख केंद्र म्हणून या कापड दुकानाची सुरुवात केली आहे.स्वामिनी कलेक्शन या भव्य कापड दुकानाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 15) महाळुंगे इंगळे पोलीस चौकीतील निरीक्षक अरविंद पवार यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रोहीदास तुपे, विनायक तुपे, शिवाजी वर्पे, विनोद महाळुंगकर, राजेंद्र इंगळे इनामदार, नंदकुमार महाळुंगकर, मनोहर दाभाडे उपस्थित होते. या दुकानाचे मालक सोनाली भानुदास गायकवाड तसेच भानुदास गायकवाड यांनी कांजीवरम, गढवाल, बनारसी शालू, महिलांच्या पारंपरिक साड्या, पैठण्या, डिझाइनर साड्या, ड्रेस मटेरियल, आकर्षक पंजाबी ड्रेस, विवाह प्रसंगी घालण्याचे घागरा ओढणी, तसेच कपड्याच्या विविध प्रकारच्या असंख्य व्हरायटीज या ठिकाणी पाहायला मिळतात.
त्याचप्रमाणे पुरुषांसाठी रेड ऍडटेलर, रेमंड, बिर्ला, सियाराम अशा नामांकित कंपन्यांचे सूटींग-शटिंगचे कापडतसेच ब्लेझर, जोधपुरी, शेरवानी देखील उपलब्ध आहे. विविध प्रकारच्या कपड्यावर डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांचेही स्टायलिश आणि फॅशनेबल, आकर्षक डिझाइनचे कपडेही “स्वामिनी कलेक्शन’मध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वस्त्रदालनाला भेट देऊन वस्त्रखरेदीचा खरा आनंद अनुभवावा, असे आवाहन शुभारंभाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केले आहे.
उत्पादकाकडून थेट ग्राहकांपर्यंत
उत्पादकाकडून थेट ग्राहकांपर्यंत साड्या, पैठणी व अन्य कपडे पोचविण्यात येत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचतो, अशी माहिती “स्वामिनी कलेक्शन’चे सोनाली गायकवाड, भानुदास गायकवाड यांनी सांगितले.