अकरावी “सीईटी’चे संकेतस्थळही कोलमडले, अर्ज भरण्यात अडथळे; विद्यार्थी, पालक संतप्त

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावी “सीईटी’ अर्जासाठी उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडथळा निर्माण झाला.

राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहण्यातही अडचणी आल्या होत्या. या तांत्रिक बाबींची चौकशीसाठी पाच अधिकाऱ्यांची समितीही गठीत केली आहे. त्यापाठोपाठ आता “सीईटी’चे संकेतस्थळ लवकर ओपन होत नसल्याचे समोर आले आहे.

येत्या 21 ऑगस्ट रोजी “सीईटी’ ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्जासाठी 20 जुलैपासून हीीं:ि//लशीं.ाह-ीील.रल.ळप हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. 26 जुलैपर्यंत संधी आहे. पहिल्या दिवशी मंगळवारी 1 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यानंतर बुधवारी विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी येत आहे. त्यामुळे मंडळाने वेळीच मार्ग काढला, तर पुढील अडचणी टळणार आहेत.

हेल्पलाइनही बंद
“सीईटी’बाबत येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शनासाठी विभागीय मंडळ निहाय हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यासाठी विभागीय मंडळनिहाय सहसचिव, सहायक सचिव यांचे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र, या अधिकाऱ्यांनी सतत फोनमुळे डोकेदुखी वाढली. अखेर या अधिकाऱ्यांनी फोन स्वीच ऑफ करून ठेवले आहेत.

दोन दिवसांत
1 लाख 46 हजार विद्यार्थ्यांनी “सीईटी’चे अर्ज नोंदविले आहे. दरम्यान बुधवारी सकाळापासून संकेतस्थळावर तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. यामुळे तात्पुरते संकेतस्थळ बंदच करण्यात आले असून त्याबाबतची सूचनाही संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा सुरू झाल्यानंतर त्याबाबत सूचना देण्यात येणार आहे.
– दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.