Weather Update : सध्या देशभरातील हवामान बदलले आहे. मध्य भारत, ईशान्य आणि उत्तर भारतात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले. दिल्लीत 15 वर्षांनंतर या थंड सकाळची नोंद झाली आहे. सध्या राजधानी दिल्लीत हवामान थंड असल्याचं पाहायला मिळतं आहे.
दिल्ली एनसीआरमध्ये पाऊस पडू शकतो
राजधानी दिल्लीत गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे दिल्लीचे तापमानही घसरले आहे. उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीने गेल्या 15 वर्षांत सप्टेंबर महिन्यात अशी थंड सकाळ पाहिली आहे.
गुरुवार 19 सप्टेंबर 2024 रोजी दिल्लीत सकाळचे तापमान 21.1 अंश होते. हे सामान्यपेक्षा 4 अंश कमी आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीमध्ये आज, शुक्रवार 20 सप्टेंबर 2024 रोजी आकाश ढगाळ, हलका रिमझिम पाऊसही होईल. असं सांगण्यात आलं होत.
राजस्थानमध्ये पाऊस सुरूच राहणार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत पाऊस पडू शकतो. राज्याच्या पूर्व भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर पश्चिम राजस्थानमध्ये हवामान कोरडे राहणार आहे.
मध्य प्रदेशातील दाबाचे क्षेत्र नाजूक झाल्याने पावसाच्या हालचाली कमी होतील. जैसलमेर ते मध्य प्रदेशापर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे काही दिवस रिमझिम पाऊस सुरू राहू शकतो.
डोंगराळ भागातही पावसामुळे नुकसान
या पावसाने डोंगराळ भागातही मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने हिमाचल आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात पाऊस आणि भूस्खलनाचा इशारा जारी केला आहे. पावसामुळे हिमाचलच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तराखंडमधील हवामान आता स्वच्छ होण्यास सुरुवात होईल, जरी काही भागात हलका पाऊस पडू शकतो. तर हिमाचलमध्ये 20 सप्टेंबर 2024 नंतर काही भागात पाऊस सुरू राहील.