नवी दिल्ली – ऑक्टोबरमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये शनिवारी पाऊस झाला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीसह 17 राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. येत्या 2-3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, रविवारी व सोमवारी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार बेटे, उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याशिवाय आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान तज्ज्ञांचे सांगितले आहे. यादरम्यान स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. किनारी आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमधील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाचे परिवलन किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात आहे. चक्रीवादळ परिवलन वायव्य उत्तर प्रदेशपासून तेलंगणा, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशापर्यंत पसरले आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे. हवामान खात्याने मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.