Weather Update : उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे राज्यातील तापमान घसरले आहे. मुंबईत महाबळेश्वर पेक्षा कमी तापमान झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सोमवारी मुंबईचा पारा 13.7 अंशावर घसरला होता. तसेच पुढील पाच दिवस राज्यात अशीच थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई बरोबरच नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पारा घसरला आहे. पुढील पाच दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक शहर चांगलेच गारठले आहे.
निफाडमध्ये 8.9 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक गारठले आहेत. मात्र रब्बी पिकांना थंडी लाभदायक ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. द्राक्ष बागांना मात्र याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यामध्ये पुढील पाच दिवस आणखी थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे, मुंबई भागात तापमान घरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत पुढील काही दिवस थंडी आणखी वाढणार आहे.
राज्यभरात गारठा वाढल्यामुळे ठिकठिकाणी नागरिक शेकोटी पेटवत आहेत. कोकणात रायगड जिल्ह्याचे तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हवेतील आर्द्रता कमी झाली असून वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे.