Weather Alert : पावसाची विश्रांती; ‘या’ आठवड्यात कुठे कुठे बरसतील श्रावणधारा

पुणे – मागच्या आठवड्यात कोकणात आलेल्या अस्मानी संकटाने अनेकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. त्यातून कोकणासह राज्य सावरत असतानाच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाबद्दल आपला अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस तरी राज्याच्या कोणत्याही भागात मोठय़ा पावसाची शक्यता नाही. अनेक ठिकाणी सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होत असल्याने पाऊस पूर्णपणे विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

या कालावधीत कधी ऊन, तर कधी हलक्या श्रावणधारा बरसतील. पाऊस ओसरल्याने सध्या अनेक भागांत तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. असे देखील सांगण्यात आले आहे. या आठवड्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस विश्रांती घेईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.