गणेशोत्सवात परिधान करा मराठमोळा साज

आज गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. बाप्पाच्या आगमनावेळी स्त्रियांना नटण्याची हौस असते. अशावेळी पारंपरिक मराठमोळा साज करून उत्सावात आनंद द्विगुणित करू शकता.
गणेशोत्सवात पूजापाठ करताना, आरतीवेळी अनेक स्त्रिया पारंपरिक पेहराव करतात.

 

हटके लूकमुळे चारचौघींत सुंदर दिसण्यासाठी हा मराठमोळा लूक तुम्हीही या गणेशोत्सवात ट्राय करू शकता. यंदाही करोनाचे निर्बंध असल्यामुळे घरीच नटण्याची हौस भागवून घ्या.
साडी आणि मेकअपमध्ये बराच वेळ खर्ची पडतो. त्यामुळे कमी वेळेत हा लूक मिळवता येतो. खास मराठमोळ्या साजामुळे डिसेंट लूक मिळतो.

 

नऊवारी साडी परिधान करून सिंपल हेअर स्टाइल करा आणि केसांचा आंबाडा बांधून गजरा लावा. साड्यांमध्ये नऊवारी साडी, पेशवाई साडी, राजेशाही नऊवारी साडी ट्राय करा. पैठणीतही तुमचे सौंदर्य खुलते. पैठणी परिधान केल्यानंतर नाकात नथ हमखास घाला. थोडेफार अलंकार घालून, केसांत गजरा लावून तुम्ही मराठमोळा लूक मिळवू शकता आणि गणेशोत्सवात धमाल करू शकता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.