पुणे – कॅट ब्रिडींग स्पर्धेच्या व्यवसायातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही घटना कात्रज चौकात आयसीआयसीआय बॅंकेसमोर घडली.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यासीन नदाफ(26,रा.कात्रज) याचा कॅट ब्रिडींगचा व्यवसाय आहे. या व्यवसायीक स्पर्धेतून राग मनात धरुन फिर्यादी व फिर्यादीच्या मित्रास व्हॉटस अप कॉल करुन कात्रज चौकात बोलावून घेण्यात आले.
यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी मागे बसलेल्या एकाने लोखंडी धारदार वस्तूने फिर्यादीवर वार केले. यानंतर ते दोघेही दुचाकीवरुन पळून गेले. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील करत आहेत.