विधानसभा निवडणूकीत आम्ही मुंबईतील सर्व जागा जिंकणार- मुख्यमंत्री

मुंबई: गेल्या विधानसभा निवडणूकित शिवसेना-भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. पण आता मात्र ही चूक होऊ देणार नाही. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही टीम एकत्र आल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत आम्ही मुंबईतील सर्व 36 जागा जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.