आमची एकजूट आगामी निवडणुकीत समजेल

उंब्रज- आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता कोणत्या पक्षाची येणार हे बारा बलुतेदार, आलुतेदार, भटक्‍या विमुक्त जातीचे सामान्य माणसे ठरवतील. असा विश्वास व्यक्त करून आमची एकजूट हा पर्याय पहिला की चौथा ही आगामी निवडणूकच ठरवेल, असे प्रतिपादन बारा बलुतेदार महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले.

उंब्रज, ता. कराड येथे बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार, भटके विमुक्त जाती, आदीवासी, विशेष मागासवर्ग यांच्यासह सर्व बहुजन समाज लोकशाही संकल्प संवाद जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे नेते बालाजी शिंदे, सतिश कसबे, संदेश चव्हाण, सदाशिव हिवलेकर, अरुण खरमाटे, प्रा. कोपळसर, प्रा. प्रतापराव गुरव, दशरथ राऊत, ऍड विशाल शेजवळ, जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, डॉ. संजय कुंभार, शांताराम सुतार, संतोष बोंगाळे, रविंद्र गायकवाड, अरुण मोहिते, संतोष किरत, श्रीकांत भोसले, भाऊ दळवी, बापूसाहेब काशिद, शंकरराव मर्दाने, चंद्रकांत जगताप उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.