मुंबई : शिवसेना भवन तोडण्याची भाषा केल्यामुळे संतापलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत यांनी, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा इशारा देत यायचंय तर या मग, असं संजय राऊत यांनी म्हटले. त्यावर निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
निलेश राणे यांनीसंजय राऊत यांचा इशारा देण्यासाठी एक ट्विटकेले आहे. यात त्यांनी संजय राऊतांना शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ असा इशाराच दिला आहे.
हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 2, 2021
“हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत,” असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
निलेश राणे यांनी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यावरही ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत असं म्हणत निलेश राणेंनी सदा सरवणकर यांना टोला लगावला आहे.