भाजप नेत्यांचा विश्‍वास सार्थ करून दाखवू

खडकवासलातील महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांचा विश्‍वास

पुणे – अभ्यासू, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी संघर्ष करणारा, कामांचा पाठपुरावा करणारा लोकप्रतिनिधी अशी आपली प्रतिमा खडकवासला विधानसभा मतदारसंघात आहे. हीच प्रतिमा आपल्याला यशस्वी वाटचालीसाठी उपयोगी आहे, असे केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकाद्वारे शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा माझ्यासाठी आशीर्वाद असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थ करून दाखवू, असे मत खडकवासला विधानसभेतील महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केले.

तापकीर यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बालाजीनगर, राजीव गांधीनगर, लेक टाऊन परिसर या भागात पदयात्रा काढल्या. तसेच विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करून मतदारांशी संवाद साधला.

यावेळी नगरसेविका राणी भोसले, रुपाली धावडे, पदाधिकारी दिगंबर डवरी, रायबा भोसले, दिनेश उर्फ पिंटू धावडे, शिवाजी धनकवडे, संभाजी भोसले, जितेंद्र कोंढरे, विकास लवटे, अमोल म्हस्के, अमोल वागसकर, सतीश अर्जुन, शंकर भोकसे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.